Friday, October 2, 2009

इंसान की फितरत...

आमच्या नागपूरच्या खान सरांनी एकवलेला एक शेर...

कितना कमजर्फ हैं ये गुब्बारा...

चंद सासों में फुल जाता हैं

थोडा उप्पर उठ जाये तो,

औकात भूल जाता हैं

Sunday, September 13, 2009

स्वप्न तारकांचे...

स्वप्न तारकांचे...असे तोडू नको
रात हि मधेच... सोडू नको
विझूदे चांदण्यां जराश्या..डाव मोडू नको

फुलतील तारकांचे..स्वप्न रुपेरी अजून
खुलेल रातराणी...पसरेल गंध अजून
तो पहा पारिजात... उभा न उमलताच तिथे
श्वासात तुझाच गंध ... पुसू नको..

जादुगरी चांदण्यांची... संपली कुठे
रंगतोय मैफिलीत मारवा आता कुठे..
मधेच भैरवी अशी...तू छेडू नको

रात्र मिलनाची...आली युगा-युगांनी
वाट पाहताना, तो चंद्र हि बुडाला..
रंगू दे खेळ श्वासांचा...
तू अशी पाश तोडू नको

श्वासात गुंफू दे श्वास...फुलू दे निखारे
आज रंगू दे मला रंगात तुझ्या... अंगात तुझ्या...
पदर ढळलेला सावरू नको..

डोळ्यात साठवू दे...रूप हे नशीले...
देह हा शबनमी...अशी लपवू नको

--अमित

Tuesday, September 1, 2009

दूर राहिलेल्या स्वप्नांनो

काही दिवसांपूर्वी लिहिलेलं काहीतरी... असच ड्राफ्ट मोड मध्ये होता खूप दिवस माझ्या वहीत... आता हक्काची जागा मिळाली लिहायला...












दूर राहिलेल्या स्वप्नांनो, या स्वप्नात कधीतरी,
डोळ्यात आसवांना, आणा कधीतरी...

भटकतो एकटा रानात आठवणींच्या,
एथेच आडवळणी , भेटा कधीतरी...

स्पर्श तो हळवा, पारिजात पेटलेला,
आठवून सुगंध सारा, जळतो कधी तरी...

क्षण घेऊन उसने आजचे काही, करतो मुशाफिरी,
कर्ज काळाचे, मग फेडतो कधीतरी...

स्वप्नात जागलेले, स्वप्न आसमानी,
भान वास्तवाचे, मग येते कधीतरी...

-- अमित

Wednesday, August 26, 2009

श्री गणेशा ... एका ब्लॉगर चा आणि एका ब्लॉग चा

करेन म्हणता म्हणता राहुनच जात होतं... पण आज मुहूर्त निघालाच... नव्हे... काढलाच मी... आणि एकदाचा झाला ब्लॉग तयार... आता त्यात लिहिणार काय आणि किती सातत्य राखु शकतो हा भाग अलहिदा...
बघू... गणपति बाप्पा च्या आशिर्वादाने सुरुवात तर झाली...



एक शेर: "सिफत हीरे की हो, तो अंधेरे में मिलो ... उजाले में तों कांच भी चमक जाते हैं "