Friday, May 27, 2011

आठवण आली तुझी

काही नाहीं ग.. सहजच.. आठवण आली तुझी..
नेहेमी दिसतेस त्या झाडाखाली ..
नेहेमी दिसतेस त्या वळणावरती..
नेहमीच असते त्या स्वप्नामध्ये...
कुठे म्हणून कुठेच आज दिसली नाहीस..

मन उगीच कावरं-बावरं झालं ..
शोधत फिरलो तुला रानोमाळ..

समुद्र किनार्यावर ही आलो शोधून..
जंगले,नद्या, पर्वतं, दऱ्या, खोर्या ... सगळे शोधून झालेत.. कुठे हरवलीस?

म्हंटल मनातच बघावं आहेस का तिथे अजून तरी... एखाद्या कोपर्यात
तिथे मात्र लगेच सापडलीस....
माझ्या मनातल्या पारिजातकाची फुलं वेचत बसली होतीस .. तुझ्या मनाच्या अंगणात पडलेली..