उगीच काहीतरी येत राहतं मनात.. तेच लिहून घेतो पटकन इथे.. मनातलं पानांत (डायरीच्या ) आणि पानांतल मनात करत राहण्या पेक्षा हे बराय आपलं..
तू गुंतूनी संसारात अशी, मी असाच एकला काठावर .... कधी बघशील का तू मागे? वळणावरल्या बाकावर....
#मोहा
मी मांडत गेलो डाव, ती उधळत गेली.... सावरून बटा स्वतःच्या, मज फसवत गेली... शब्द कधी हे फसवे, अलगद पेरत गेली... नजरेने करुनी पारध, उगाच रिझवत गेली... मी जिंकत जिंकत आलो, अन ती हरवत गेली... माज असा मग माझा, ती चिरडत गेली...