Friday, October 2, 2015

असाच जागताना...


कित्येक अशा ह्या राती,
उगाच जागत बसलो..
अन् रिते तुझे डोळे,
मी झोप शोधत फिरलो...

रात्रीचा प्रहर हा तिसरा,
साचला अंधार चहूबाजूंनी...
पुनवेचा चन्द्रही गिळला,
कृष्णकाळ्या मेघांनी...

माझ्याच सारखा कोणी,
गिरवीत आहे गज़ला...
दूर फकीर तो जागा,
आठवतंय कोणी त्याला?


Sunday, June 21, 2015

कोरडे तराणे...



असे पावसाचे येणे,
आणि दूर तुझे हे रहाणे...

ओठांवर तुझ्या अश्या,
ओल्या थेंबाचे गोंदणे...

आणि मनाचे हे माझे,
असे कोरडे तराणे...


Sunday, June 14, 2015

आयुष्याचा भारा...



आयुष्याचा पेलत भारा,
उसंत नाही कुणास क्षणभर...
मणामणा चे ओझे असुदे,
मनात असुदे चिंता मणभर...
परी मर्दानी ह्या खांद्यावरुनी,
ढळला हा विश्वास ना कणभर...
कशास रडणे गात फिरू मी?  
हसूच ओठी ह्या काकणभर..

-अमित

© Amit Mohod

Thursday, June 4, 2015

अनाहूत..


यावे असे कधीही,
अनाहूत पावसाने...
आठवणी जश्या तुझ्या या,
स्मराव्यात ओल्या मनाने....

येऊ नये कधी,
यावे कुण्या क्षणाला...
भान नसते कसे बघ,
या आठवांच्या घनाला...

Monday, August 18, 2014

हे तुझं बरं असतं...

हे तुझं बरं असतं...

बोलणंच टाळलं,
की पुढचे प्रश्न टाळता येतात
त्यांच्या उत्तरांसकट..

मग पुढचं सगळंच टाळता येतं..
आशा, अपेक्षा,
आर्जवं, विनंत्या....
आणि भेट...

सगळंच..

Sunday, March 30, 2014

बेतरतिब …

यहाँ कुछ सिसकतीसी यादें रखी हैं....
मेरी चादर पर पड़ी सिलवटो की तरह…
बेतरतिब……

कुछ सहमे हुए से सपने,
यहाँ वहाँ बिखरे पड़े हैं.....
तकियों से लिपटे हुये....  

कुछ हँसी की फुहारें
दीवारो पर फैली है....
तुम्हारे फेंके हुए
होली के रंगो कि तरह…

और तुम्हारी अल्लड सी,
बेमतलब कि, फिर भी  मीठी बातें,
कोने में दुबकी बैठी हैं..
मेरी ग़ज़लों कि किताबों के
पिछेसे झाँकती हुयी सी…

और वो सारे गीले-शिकवे भी लटके हुए है…
पर्दो कि तरह.…
मेरे जेहन कि खिड़कियों पर…
मुस्कुराते हुये…

अरे.… रहने भी दो… मत सवारों इन्हे…
मैं भी कहा अभी सवरं पाया हु.…