Friday, June 30, 2017

सुगंध..

बाईक ला किक मारून, सोसायटीतल्या मंदिरा समोर रोजच्या सवयी प्रमाणे नमस्कार करून तुम्ही रस्त्याला लागता.. बाईक अन विचार दोन्ही आपापल्या स्पीड नं चालत असतात.. ऑफिसात आजच वाढून ठेवलेलं काम.. कुठल्या तरी गृपात झालेली नेगेटीव्ह चर्चा.. wrong side न गाडी अंगावर आणणारे अन एकंदर ट्राफिक चा आक्रस्ताळेपणा... ह्या सगळ्या नकारात्म्कतेला फेस करत तुम्ही जात असता... वैतागायला होत असतं.... but you keep going…

तितक्यात एक गोड, मधुर, तरल असा सुगंध तरळत येतो.. तुम्ही नकळत त्या सुगंधाचा source शोधता.. बाजूने गेलेली एक गुलाबी वेस्पा तो सुगंध वार्यावर पसरत जात असते.. सगळी निगेटीव्हिटी, नकारात्मकता, वैताग जावून मन उगाच प्रफुल्लीत वगैरे होतं.. सगळ पोजेटीव्ह वाटायला लागतं... मग कितीतरी वेळ तो सुगंध रस्ताभर पुढ मागं तरळत जात असतो.. आणि नेमकं पुढच्या सिग्नल ला ती व्हेस्पा तुमच्या बाजूला येवून थांबते.. "Nice Perfume.." तुम्ही नकळत म्हणता.. आणि तो सुगंध हलकेच छानसं स्माईल करून पुढे निघून जातो..

आणि तुम्ही दिवसभर तो सुगंध सोबत वागवत दिवसातलं सगळंकाही पोजेटीव्ह नोट वर प्रसन्नपणे फेस करत जाता..
#मोहाचे_क्षण
#मोहा

Sunday, June 18, 2017

चलो फिर दिन ढला


चलो फिर दिन ढला,
चलो फिर शाम हुई,
कुछ दर्द उतरे फिर कागज पर,
और कुछ की ग़ज़ल हुई..

#मोहा

Monday, June 12, 2017

तू, रात, मैं, तारे...

रात अपना आँचल फैलाये,
मुझे बुलाती है...
और मैं ठुकरा कर उसका सुहाना बुलावा,
सारी रात, तेरे साथ
उसी रात के किनार बैठा रहता हूं...
तेरे स्याह जुल्फों में उलझ कर,
इस रात से भी स्याह और गहरे मेरे सपने,
तेरी आँखों में बुनता रहता हूं...

चल, नाकाम कर आते है,
उस रात की गहरी साजिश,
हमें थपकिया दिलाकर सुलाने की,
चल, रात भर वही बैठे रहते है,
चांद से आँख मीचौलि खेलते रहते है,
और तारोंको गिन कर आधे आधे बाट लेते है...

तू उनसे अपना दामन सजाना,
मैं मेरे हिस्से के तेरी छत पर टांगकर आऊंगा,
मेरी याद आये कभी तो,
मेरे हिस्से के तारें, फिर गिन लेना..

#मोहा

Sunday, March 19, 2017

सुना हैं....

कोई निशानी तो छोड़,
के हालेदिल तुझ तक पहुँचता रहे,
सुना हैं तूने अपना पता बदल दिया...

कोई कैसे दुआ करे, कैसे करे इबादत कोई,
सुना हैं तूने फिर अपना खुदा बदल दिया...

कुछ तो खयाल करता,
ढलती उम्र का मेरी,
अकेला छोड़ यु,कारवाँ बदल दिया....

#मोहा

Saturday, March 18, 2017

रात दिसाचे अंतरं...

[दोन जीव.... पृथ्वीच्या दोन टोकांवर राहणारे... ह्याच्या कडे पहाट होतेय.. तर तिच्या कडे मध्यरात्र उलटली नुकतीच... ह्याच्या जीवाची होणारी घालमेल सांगणाऱ्या काही ओळी...]

माझी कधीचीच ती,
पहाट गं झाली,
तुझी ती रात,
कशी सरता सरेना.... 

माझी रातराणी ,
कोमेजली उमलून ,
तुझा प्राजक्त,
हा जरा तर फुलेंना

माझी उगवती दिशा,
लाल केशरी जहाली,
तुझे नभ आणि बघ,
निळा चांदवा सोडेना...

रात दिसाचे गं आता,
मिटवं हे अंतर,
एकटा एकटा हा आता,
प्रवास चालवेना..

#मोहा

Saturday, March 11, 2017

आमच्या लहानपणी व्हाट्सअप्प असतं तर...

चिभिन, आमच्या लहानपणी व्हाट्सअप्प असाले पायजेल होतं ना... इतके म्यासेज वाचून कोंचाबी निबंध एक्दम पटकन लिवाले आला असता...

माझा आवडता सण:  घ्या होळी चे म्यासेज
सुविचारांचे जीवनातले महत्व: उचला पाटेकर नई तं नांगरे पाटील
माझे आवडते लेखक: वपु घ्या, पुलं घ्या...
विज्ञानाचे महत्व: सांगा का नासा अन इस्रो कसे ट्राकिंग करतेत
अंधश्रद्दा?? धा जनाले म्यासेज नई पाठवला तं कसं अन का नुस्कान होते ते लिव्हाच..

सगळंच कसं सोप्प सोप्प झालं असतं ब्वा... आम्ही भयताडा सारखं निबंधाची पुस्तकं वाचत बसलो ना...

#मोहा

हॅपी होळी...

सक्काळी सक्काळी छान छान, समाजोपयोगी, समाजप्रबोधनपर मेसेजेस लिहीणार्या सगळ्या समाजसुधारक, समाज धुरिणांनी मला अगदी सक्काळी सक्काळी कॉन्फरणसात घेतले...

त्यात नाना पाटेकर, नांगरे पाटील, व.पू, पू.ल.. अशे सगळे होते... अरे हा, स्वामीजी आन आर्य चाणक्य पण होतेच कि...

त्या सर्वांनी मिळून मला महत्वाची कामगिरी बजवायला सांगितलिये... त्यांचा संदेश:

"हॅप्पी होळी...."

मला ह्या सगळ्यांनी हा संदेश सुदूर, आसेतुहिमाचल वगैरे प्रसारित करायला सांगितले आहे..
आता मला हे समाजसुधाराचं कार्य एकट्याने करणं शक्य नाही.. तुम्हा सर्वांनी मदत केली तरच शक्य होईल..
तर वाट कसली बघताय.. हा मॅसेज इतका फॉरवर्ड करा की सगळ्या ब्रम्हांडात (नासा ने हल्लीच शोधलेल्या एक्सो-प्लॅनेट्स आणि त्या पलीकडे, आपली गॅलेक्सी ओलांडून पलीकडच्या गॅलेक्सीत पन) पोचलाच पाहिजे....

कोण कितीवेळा पाठवतो ते ट्रॅक करायला नासा ने इस्रो सोबत मिळून स्पेशल सॉफ्टवेअर बनवलं आहे..हे पण कालच कळलं मला...
आणि सगळ्यात जास्त मॅसेज पुढं पाठवणार्याला युनेस्को तर्फे स्पेशल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे... आणि मोदी त्यांच्या पाकिस्तानातल्या निवडणुकी ची सोशल मीडिया ची जब्बाब्दरी पण देणार आहेत...

चला मग, लागा कामाला...

ता.क: आमटे आणि धर्माधिकारी प्रभूतींनी कॉल लेट ज्वाइन केल्या मुळे त्यांची नावं सुटलीत...

#मोहा