Wednesday, July 13, 2011

कोणी तरी माये चा पूत आहे का आम्हाला वाचवणारा?? एक तरी, वाघाचा बच्चा??




आज पुन्हा त्यांनी वार केला.. मुंबई वर.. लागोपाठ ३ स्फोट.. शेकडो लोक घायाळ.. मरणारे मेलेत.. सुटलेत..
त्यांच्या मढ्यावर बसून आम्ही रडणार.. आज.. उद्या.. परवा..
आमचे शेळपट शिलेदार गर्जना करणार "आम्ही ह्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. ह्याची सखोल चौकशी करण्या साठी अमुक-अमुक लोकांची उच्चस्तरीय समिती आम्ही स्थापणार आहो." आणि असचं काही-बाही..
मागच्या कित्येक बॉम्ब-हल्यात मारून गुळगुळीत झालेल्या बोंबा पुन्हा मारतील.. आणि परत, ते पण विसरतील आणि आम्ही पण..
AC ऑफिसेस मध्ये बसून निषेध आणि दिलगिरी व्यक्त करण्या पलीकडे हे मातृगामी काहीही करू शकत नाहीं.. आणि आम्ही पण हतबल होण्या शिवाय काहीही करू शकत नाहीं.

मग नेर्वा नंतर परत मुंबई च्या स्पिरीटच कौतुक होणार.. आरे कसल घंट्याच स्पिरीट?? साल्यानो, तुम्ही आम्हाला असं मरायला सोडून दिल्यावर दुसरं आम्ही काय करणार??
पोटापाण्या साठी त्याच मरणाच्या दारात परत जावचं लागणार आम्हाला.. मरे पर्यंत..
आजच्या स्फोटात नाहीं ना मेलो मी??? मग पुढच्या स्फोटात, हल्ल्यात, ग्यांग वार मध्ये... जो पर्यंत मरत नाहीं तो पर्यंत जगावाच लागणार...
आज सुपात आहे.. उद्या जात्यात जाणारच.. वाट बघतोय.. पुढच्या हल्ल्याची.. कुत्र्याच्या मौतीन मरायची...

कोणी तरी माये चा पूत आहे का आम्हाला वाचवणारा?? आमच्या लेकरा-बाळांना वाचवणारा..?? एवढ्या मोठ्या सरकारी यंत्रणेत.. एक तरी, वाघाचा बच्चा?
का सगळेच मुर्दाड झालेत.. षंढ... माझ्या सारखे??

आम्ही मरुच.. असंच कधी तरी.. पण खबरदार.. लक्ष्यात ठेवा.. कोणीही सुटणार नाहीं .. तुमच्या सकट.. जसे आम्ही सुपात आहोत, तुम्ही पण तिथेच आहात. वाट बघा फक्त.. कधी जात्यात टाकतात ते ही औरंगजेबाची औलाद तुम्हाला आणि आम्हाला...

वाट पाहण्या शिवाय काय करू शकतो आम्ही?? कदाचित संताप व्यक्त करू.. निषेध नोंदवू.. फार फार तर मेणबत्ती घेऊन मोर्चे काढू.. CST ते आझाद मैदान.. शांती मोर्चा.. जे मेलेत त्यांच्या साठी मौन प्रार्थना करून परत येऊ आमच्या खुराड्यात.. वाट बघत.. की आमच्या साठी कधी कोण मेणबत्ती पेटवेल म्हणून..

माझ्या तुमच्या सारख्या षंढ लोकांनी निवडून दिलेले षंढ सरकार... शेपूटघाली प्रवृत्ती. थेट गल्ली पासून दिल्ली पर्यंत.. कुठे प्रतिकारच करत नाहीं कोणी...
साले ते विरोधी पक्ष वाले पण काहीच करत नाहीत.. नासुकल्या, भिक्कार मुद्यासाठी संसदेचा अमूल्य असा वेळचा आणि पर्यायाने करोडो रुपयांचा चुराडा करतात...
पण या मुद्यावर कधीच सरकार ला धारेवर धरत नाहीं..
सगळे एकजात षंढ.. माझ्या सकट..

चीड चीड होतेय.. काय लिहित सुटलोय मलाच कळत नाहीं..
जाउद्या.. झोपतो आता.. उद्या परत लवकर उठायचं.. मरणाची वाट पाहायला..