Friday, October 2, 2015

असाच जागताना...


कित्येक अशा ह्या राती,
उगाच जागत बसलो..
अन् रिते तुझे डोळे,
मी झोप शोधत फिरलो...

रात्रीचा प्रहर हा तिसरा,
साचला अंधार चहूबाजूंनी...
पुनवेचा चन्द्रही गिळला,
कृष्णकाळ्या मेघांनी...

माझ्याच सारखा कोणी,
गिरवीत आहे गज़ला...
दूर फकीर तो जागा,
आठवतंय कोणी त्याला?


Sunday, June 21, 2015

कोरडे तराणे...असे पावसाचे येणे,
आणि दूर तुझे हे रहाणे...

ओठांवर तुझ्या अश्या,
ओल्या थेंबाचे गोंदणे...

आणि मनाचे हे माझे,
असे कोरडे तराणे...


Sunday, June 14, 2015

आयुष्याचा भारा...आयुष्याचा पेलत भारा,
उसंत नाही कुणास क्षणभर...
मणामणा चे ओझे असुदे,
मनात असुदे चिंता मणभर...
परी मर्दानी ह्या खांद्यावरुनी,
ढळला हा विश्वास ना कणभर...
कशास रडणे गात फिरू मी?  
हसूच ओठी ह्या काकणभर..

-अमित

© Amit Mohod

Thursday, June 4, 2015

अनाहूत..


यावे असे कधीही,
अनाहूत पावसाने...
आठवणी जश्या तुझ्या या,
स्मराव्यात ओल्या मनाने....

येऊ नये कधी,
यावे कुण्या क्षणाला...
भान नसते कसे बघ,
या आठवांच्या घनाला...