Saturday, July 29, 2017

तू नसताना...

तू नसताना मी थांबणार नाहीच.. चालत राहीन.. काळ पुढे जातो तसा... पण पोचणार मात्र कुठेच नाही...
तू नसताना कुठे पोहोचायची ना घाई ना उत्सुकता ना उत्कंठा... गरज ही नाही खरं तर... पण लोकलाजेसत्व अन राहटगाडग्याची सवय म्हणून चालत राहीन.. तू गेलीस आणि मी संपलो, थांबलो असं कुणी म्हणून तुला उगाच बोल लावू नये म्हणून.... मी चालत राहीन एकटा, तू परत येत पर्यंत.. प्रारब्धाच्या वाटेवर.. मागे वळून बघत राहीनंच... कुठल्या तरी वळणावर तू येशील परत कदाचित... पण, तुला आपली नेहेमीची वाट आठवेल ना? की नव्या वाटा, नवे प्रवासी असं होईल तुझं?
हरकत नाही माझी काही त्याला पण.. तो तुझा प्रवास आहे.. कुणासोबत कुठल्या वाटेवर जायचं हे तुझं तूच ठरवशील... फक्त आपला प्रवास, आपण हुडकून, शोधून काढलेली वाट आठवणीत ठेव.. तू म्हंटली होतीस, आपण कुठे पोहोचू माहित नाही.. पण हा प्रवास, हि वाट सुंदर आहे.. तुझ्याच सारखं मला पण वाटायचं कि ती कधी संपूच नये...

असो, मी वाट बघिनच आणि तू येशीलच... पण नव्या प्रवासाच्या आणि प्रवाश्याच्या आठवणीत मी असणार ना?

#मोहा

Monday, July 10, 2017

ऐक ना...

ऐक ना,

जाताना जरा तो दिवा मालवून जा आठवणींचा..
जरा जास्तच उजेड पडतो त्याचा रात्रीच्या काळोखात...
तो माझ्याकडे अन मी त्याच्याकडे बघत बसतो... ओळखीचा चेहरा आठवल्या सारखं वाटतं राहतं. पण बोलत कुणीच नाही..
आठवतं ना, तू पण अशीच उभी असायची बघत.. अनोळखी असल्या सारखी... अन मी शोधत बसायचो त्या साऱ्या ओळखीच्या खुणा तुझ्या काजळ भरल्या डोळ्यात..

#मोहा

Saturday, July 1, 2017

दर्द छलक ही जाता हैं

दर्द छलक ही जाता हैं,
यू अफसानों को पढ़ते ही...
लफ्ज आ जाते है कागज पर..
गजलो में ढलते ही..

बारिश की बूंदों से फिर,
बजते रहते तालो पर..
कभी धुंध से छां जाते,
सर्दी में चलते चलते ही..

दिन तो तेरा होता था,
रात होती मेरी थी...
मिल जाते शामो में हम,
चाँद के युं पिघलते ही...

#मोहा