स्वप्न तारकांचे...असे तोडू नको
रात हि मधेच... सोडू नको
विझूदे चांदण्यां जराश्या..डाव मोडू नको
फुलतील तारकांचे..स्वप्न रुपेरी अजून
खुलेल रातराणी...पसरेल गंध अजून
तो पहा पारिजात... उभा न उमलताच तिथे
श्वासात तुझाच गंध ... पुसू नको..
जादुगरी चांदण्यांची... संपली कुठे
रंगतोय मैफिलीत मारवा आता कुठे..
मधेच भैरवी अशी...तू छेडू नको
रात्र मिलनाची...आली युगा-युगांनी
वाट पाहताना, तो चंद्र हि बुडाला..
रंगू दे खेळ श्वासांचा...
तू अशी पाश तोडू नको
श्वासात गुंफू दे श्वास...फुलू दे निखारे
आज रंगू दे मला रंगात तुझ्या... अंगात तुझ्या...
पदर ढळलेला सावरू नको..
डोळ्यात साठवू दे...रूप हे नशीले...
देह हा शबनमी...अशी लपवू नको
--अमित
wa wa.. kya baat hai.. sundar...
ReplyDeletesuperb, mala mahit navhate tu itka chhan lihit asashil. Mala khup aavdel tuzya aankhi kahi kavita astil tar vachayla. - Anil Khamkar
ReplyDeleteThanks Anil.. welcome to blog..
ReplyDeletereally nice one
ReplyDeleteधन्यवाद श्यामली.. .
ReplyDelete