डोळ्यांच्या पलीकडे स्वप्नांचं गाव,
जायला तिथे मात्र, वेळ नही राव...
रोज स्वप्नात खुणावते शिनेमातली डिम्पल,
दिसते किती स्वीट आणि सिम्पल,
घेणारच असतो बाहुपाशात तिला,
गजर घड्याळाचा ओरडतो तेवढ्यात..
उठ मेल्या... कामाला चल.. कामाला चल..
रोज सालं असच घडत असत, आन आयुष्य हे असच सरत असत.
केव्हा पासून बनवतोय बेत मित्रांना भेटायचा भारी,
थंडगार बियर आणि मस्त सावजीची चिकन करी,
पण घरी पोचताच दिसते किराण्याची यादी घेऊन बायको उभी दारी..
नेहेमी च्याआयला असच घडत असत, आन आयुष्य माझ असच सरत असत.
केव्हा पासून बनवतोय फिरण्याचे प्लान्स आणि टूरिस्ट प्लेस ची लिस्ट,
पण नेहेमीच priority वर असते प्रोजेक्ट ची बग-लिस्ट
या बग्सच सोलुशन तर गुगल वर सापडतं,
आयुष्याच्या बग्स चा Patch देईल असा गुगलच नाही बनत..
माझ्या स्वप्नांतच दडलाय तो जादूचा मंत्र,
पण शोधायचं मात्र अवगत नही तंत्र.
मग उरतं काय मित्रा कविता करण्या शिवाय,
आणि दिवसाच्या शेवटी आयुष्याचं यमक जुळवण्या शिवाय,
वर्षा-नु-वर्ष असच चालू असतं, आणि आयुष्य माझ असच सरत असतं.....
अतिशय सुरेख.. सुरुवात इनोदी करत शेवटी शेवटी मस्तच सिरीयस झालायस..
ReplyDelete"या बग्सच सोलुशन तर गुगल वर सापडतं,
आयुष्याच्या बग्स चा Patch देईल असा गुगलच नाही बनत."
हे तर सॉलिडच..
धन्यवाद हेरंब .. as usual inspiring comment.. :)
ReplyDeleteखरच मस्त जमली आहे कविता...
ReplyDeleteधन्यवाद दवबिंदू.. ब्लॉग वर स्वागत..
ReplyDeleteकाय कविता केली राव, सोडा ते सोफ्टेवर फोप्टेवर बनवणे, आणि बना गुरु ठाकूर.
ReplyDeleteलए भारी अमित ....कल्या तुज्या वेदना...भा पो
ReplyDeletevery true...
ReplyDeleteFinally aaj vel milala tujha blog vachnyacha.....ani saglya kavita ekdum vachun taklya......mahit nahi punha kadhi vel milel parat.....but i liked all the them......asach lihat raha ani aamchya manat asach ghar karat raha......
ReplyDeleteBharriii.........!!!
ReplyDelete:)
खूप सुरेख. माझ्या रिमझिम पाऊसला दिलेली तुमची प्रतिक्रिया मिळाली. आभार.
ReplyDelete