Sunday, May 5, 2019

सांजवेळी...

Image credit: https://media.artgallery.nsw.gov.au/collection_images/8/81.2010.a-j%23g%23S.jpg

तू होतेस हळवी, का अशी सांजवेळी,
रंगात मावळतीच्या, गुंतते सांजवेळी...

कातर किनारे, ओथंबल्या घनाचे,
पदरास तुझ्या, बिलगतात सांजवेळी...

रंगतो... बदलतो, जसा नभाचा पसारा,
असा बोलका तुझा, चेहरा सांजवेळी...

मी राखून ठेवतो, सारा चांद रातीचा,
तू निवडून वेचते, बस चांदण्या सांजवेळी,

ठरलेल्या संकेतांची, वाट मी पहावी,
तू विझवून दीप सारे, विझतेस सांजवेळी...

उद्या उगवतीस, उगवशील तू नव्याने,
पण रोज हाय का, तू मावळतेस सांजवेळी?

#मोहा

No comments:

Post a Comment