तुझ्या उजेडाचे गोडवे गात जा तू,
मी माझ्या तमाला कुरवाळून घेतो...
बुडशील बघ आज रात्री तुझ्या तू,
माझ्या सकाळी मी हा झळाळून येतो...
कुणाला दाखवितो फुकाची मिजास?
का असा उगा उर बडवून घेतो?
तुला फासला तयांनी शेंदूर फार
तू ही स्वतःला देव ठरवून घेतो..
येण्या अन जाण्याचे चक्र निरंतर,
माझे-तुझे आरे 'तो' फिरवुन घेतो..
आटला परी आज हा झरा कोरडा,
पुन्हा श्रावणी तो खळाळून येतो..
#मोहा
मी माझ्या तमाला कुरवाळून घेतो...
बुडशील बघ आज रात्री तुझ्या तू,
माझ्या सकाळी मी हा झळाळून येतो...
कुणाला दाखवितो फुकाची मिजास?
का असा उगा उर बडवून घेतो?
तुला फासला तयांनी शेंदूर फार
तू ही स्वतःला देव ठरवून घेतो..
येण्या अन जाण्याचे चक्र निरंतर,
माझे-तुझे आरे 'तो' फिरवुन घेतो..
आटला परी आज हा झरा कोरडा,
पुन्हा श्रावणी तो खळाळून येतो..
#मोहा
धन्यवाद 🙏🏼🙂
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteधन्यवाद निलेश.
Deletechhan
ReplyDeleteधन्यवाद🙏🏼
Deleteखुप छान शब्दांशी खेळतोस तू...त्याच त्या भावनेला नव्याने अर्थ देतोस तू....👍
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद. येत रहा ब्लॉग वर🙏🏼
ReplyDeletechan��
ReplyDelete