Thursday, June 4, 2020

मी काटयांचे फुल झालो

तुझ्या केसांत जावा माळल्या म्हणून बघ,
आणि मी काटयांचे फुल झालो, म्हणून बघ..

ओवून घे ना, माझ्या कळ्यांना, माळ गजरा,
ओवतांना कळी, तुझे श्वास तू मोजून बघ..

तू दिलेल्या फुलाचे, कोण जाणे काय झाले,
त्याचीच ही का झाली गझल? गाऊन बघ...

घेतला काढून तू, सुगंध तो अंतरीचा,
मग उरल्या पाकळ्या, त्याही जाळून बघ..

 निर्माल्य होत नाही, शेवटी साऱ्या फुलांचे,
 पुस्तकांत उरतात काही, वाहून बघ..

#मोहा

4 comments:

  1. खुपच छान गझल लिहलीय आपण अमित सर....

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. पण हे जे लिहिलंय ते गझलेच्या व्याख्येत बसते का हे मला नाही माहीत.

      Delete