Saturday, March 18, 2017

रात दिसाचे अंतरं...

[दोन जीव.... पृथ्वीच्या दोन टोकांवर राहणारे... ह्याच्या कडे पहाट होतेय.. तर तिच्या कडे मध्यरात्र उलटली नुकतीच... ह्याच्या जीवाची होणारी घालमेल सांगणाऱ्या काही ओळी...]

माझी कधीचीच ती,
पहाट गं झाली,
तुझी ती रात,
कशी सरता सरेना.... 

माझी रातराणी ,
कोमेजली उमलून ,
तुझा प्राजक्त,
हा जरा तर फुलेंना

माझी उगवती दिशा,
लाल केशरी जहाली,
तुझे नभ आणि बघ,
निळा चांदवा सोडेना...

रात दिसाचे गं आता,
मिटवं हे अंतर,
एकटा एकटा हा आता,
प्रवास चालवेना..

#मोहा

No comments:

Post a Comment