Saturday, March 11, 2017

आमच्या लहानपणी व्हाट्सअप्प असतं तर...

चिभिन, आमच्या लहानपणी व्हाट्सअप्प असाले पायजेल होतं ना... इतके म्यासेज वाचून कोंचाबी निबंध एक्दम पटकन लिवाले आला असता...

माझा आवडता सण:  घ्या होळी चे म्यासेज
सुविचारांचे जीवनातले महत्व: उचला पाटेकर नई तं नांगरे पाटील
माझे आवडते लेखक: वपु घ्या, पुलं घ्या...
विज्ञानाचे महत्व: सांगा का नासा अन इस्रो कसे ट्राकिंग करतेत
अंधश्रद्दा?? धा जनाले म्यासेज नई पाठवला तं कसं अन का नुस्कान होते ते लिव्हाच..

सगळंच कसं सोप्प सोप्प झालं असतं ब्वा... आम्ही भयताडा सारखं निबंधाची पुस्तकं वाचत बसलो ना...

#मोहा

No comments:

Post a Comment