Friday, June 30, 2017

सुगंध..

बाईक ला किक मारून, सोसायटीतल्या मंदिरा समोर रोजच्या सवयी प्रमाणे नमस्कार करून तुम्ही रस्त्याला लागता.. बाईक अन विचार दोन्ही आपापल्या स्पीड नं चालत असतात.. ऑफिसात आजच वाढून ठेवलेलं काम.. कुठल्या तरी गृपात झालेली नेगेटीव्ह चर्चा.. wrong side न गाडी अंगावर आणणारे अन एकंदर ट्राफिक चा आक्रस्ताळेपणा... ह्या सगळ्या नकारात्म्कतेला फेस करत तुम्ही जात असता... वैतागायला होत असतं.... but you keep going…

तितक्यात एक गोड, मधुर, तरल असा सुगंध तरळत येतो.. तुम्ही नकळत त्या सुगंधाचा source शोधता.. बाजूने गेलेली एक गुलाबी वेस्पा तो सुगंध वार्यावर पसरत जात असते.. सगळी निगेटीव्हिटी, नकारात्मकता, वैताग जावून मन उगाच प्रफुल्लीत वगैरे होतं.. सगळ पोजेटीव्ह वाटायला लागतं... मग कितीतरी वेळ तो सुगंध रस्ताभर पुढ मागं तरळत जात असतो.. आणि नेमकं पुढच्या सिग्नल ला ती व्हेस्पा तुमच्या बाजूला येवून थांबते.. "Nice Perfume.." तुम्ही नकळत म्हणता.. आणि तो सुगंध हलकेच छानसं स्माईल करून पुढे निघून जातो..

आणि तुम्ही दिवसभर तो सुगंध सोबत वागवत दिवसातलं सगळंकाही पोजेटीव्ह नोट वर प्रसन्नपणे फेस करत जाता..
#मोहाचे_क्षण
#मोहा

No comments:

Post a Comment