Friday, June 12, 2020

जगाचे कायदे...

काल शिकवीत होतास, मज जगाचे कायदे
बनुनी वामन अता, मस्तकी बळीच्या पाय दे...

मांडून घे हिशोब सारे,चोपडीवर तू तुझ्या,
जातांना मोजून घेऊ, सारे तोटे अन फायदे...

क्षितिजांत अपुल्या अंतर, मी जाणून राखले,
राखलेल्या जाणिवेला, दुरूनच.. पण न्याय दे...

सदा तू ठेवून घेतो, जे हवे तुला ते माधवा,
सुदाम्याच्या पोह्याबदली, दुधावरची साय दे...

माझा गबाळेपणा, घेऊन आलो शहरी तुझ्या,
शिकव ढब रंगीली, अवतार हाय-फाय दे..

बाजारी फिरुनी मज, व्यवहार ना आले कधी
मुद्दल घेऊ कुणा कडून, व्याज म्हणून काय दे..

#मोहा

6 comments:

 1. सुरेख,सुंदर.

  ReplyDelete
 2. नमस्कार,
  तुमचे काम नक्कीच मराठी भाषा प्रसार मध्ये चांगला हातभार लावत आहे. आम्ही सुद्धा या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाईट वर तुमचं लिखाण किंवा कविता पोस्ट करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर आम्हाला कालवा .

  https://mazablog.online/write-for-us/

  ReplyDelete
 3. खुप छान माहिती आहे.आमच्या ब्लॉगल पण नक्की भेट द्या.
  JIo Marathi

  ReplyDelete