Wednesday, June 23, 2021

तू गेल्यावर..

(तुझे डोळे खट्याळ भारी,
चालून जाते कट्यार भारी)

तू लिहिल्या कविता ज्यावर
त्या पत्राचा सुवास भारी,

आपल्यातले अंतर जितके
माझा तितका प्रवास भारी,

माझ्या गझलेच्या पानांवरचा,
कोरा सुटला, समास भारी

पाणी डोळा पाहूनही तू,
न लावलास तो कयास भारी

गेलीस अन मग न येण्याचे,
तुझे बहाणे झकास, भारी

तू गेल्यावर उरले जे का
मनात ओझे, मनास भारी

#मोहा

2 comments:

  1. पहिल्यांदा च आले तुमच्या या ब्लॉग वर,
    कविता वाचून जाहले एकदम भारी 😍

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, येत जा असंच 🙂

      Delete